गोवा खबर : गणपत पार्सेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने नुकताच ग्रंथपाल दिवस साजरा केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग पंडित, गौरेश वेळीप, पुस्तक विक्रेते खलील अहमद, केदार गावकर, ग्रंथपाल केरकर ग्रंथालय कनवेनर फर्नांडिस उपस्थित होते.
ग्रंथालयाची संकल्पना बदललेली असून आता ग्रंथालय हे फक्त ग्रंथालय नसून लर्निंग रिसोर्स सेंटर म्हणून संबोधले जाते. त्यामुळे या रिसोर्स सेंटरचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, असे उद्गार पंडित यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथापाल शालिनी नाही यांनी स्वागत केले. पंडित यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. एस. आर. रंगनाथन व भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ग्रंथापाल प्रमोद केरकर यांनी रंगनाथन यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. याच दिवशी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यथिती असल्याने महाविद्यालयच्या इतिहास विभागाचे वेळीप यांनी विद्यार्थ्यांना भाऊसाहेबाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
ग्रंथालय सभासद रोशमी शेटकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी जोतम सोन्सूरकर याची मदत लाभली. शेवटी ब्रॉडवेस बुक सप्लायर व क्यूरेट्स बुक सप्लायर यांनी आणलेल्या वेगवेगळ्या पुस्तकाची माडणी करण्यात आली. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.