गोवा खबर : सरकारने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यसैनिकांना पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आझाद भवन, पर्वरी ते पत्रादेवी आणि परत अशी एका सेमी लक्झरी कदंब बसची व्यवस्था केली आहे.
जीए-०७- टी-२६२५ या क्रमांकाची कदंब बस (बस ड्रायव्हर शुभम नाईक- ( मो. नं.८२०८१०७५८३) सकाळी ९ वाजण्यापूर्वी पर्वरी येथे आझाद भवनकडे पार्क केलेली असेल.
पत्रादेवीचा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होईल. कार्यक्रम संपल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना घेऊन बस परत पर्वरी आझाद भवनकडे येईल.