गोवा खबर : माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, के. नटवर सिंग जी यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदासह अनेकविध क्षेत्रात त्यांनी देशसेवा बजावली. सृजनशील लेखक आणि प्रतिष्ठित इतिहासकार या रुपात त्यांनी नेहमीच जीवनाची आणि योगदान देण्याची उमेद जागवली. नटवर सिंग यांचे आपल्या साहित्य विश्वात आणि सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदान हृदयात चिरंतन जतन राहील.