Connect with us

गोवा खबर

१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा सायकल रॅली

Published

on

Spread the love
  • रोड रन आणि यात्राचे आयोजन

गोवा खबर : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजल्यापासून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा, सायकल रॅलीहर घर तिरंगा रोड रन आणि हर घर तिरंगा यात्राचे आयोजन केले आहे.

हर घर तिरंगा सायकल रॅली खुल्या गटात होणार आहे. सुमारे ३०० सहभागींसाठी सकाळी   ७.३० वाजल्यापासून  श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम- दोनापावल मिरामार सर्कल- डीएसवायए कार्यालय येथे   घेण्यात येईल.  हर घर तिरंगा रोड रन १७ वर्षाखालील (मुले/मुली)२५ वर्षाखालील (मुले/मुली), ४५ वर्षांखालील (महिला, पुरूष), ४५ वर्षांवरील (महिला, पुरूष), अपंग व्यक्तींसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम- जीएमसी सर्कल परत ते श्यामा प्रसाद स्टेडियम सुमारे ४५० स्पर्धकांसाठी सकाळी ७.०० वाजल्यापासून आयोजित
केली आहे.

एनएसएस स्वयंसेवकांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हर घर तिरंगा यात्रा उत्तर गोव्यासाठी आझाद मैदान ते कला अकादमी आणि दक्षिण गोव्यासाठी मडगांव नगरपालिका ते दक्षिण शैक्षणिक विभाग, सुमारे २५० स्पर्धकांसाठी सकाळी ८.३० वाजेपर्यंत आयोजित केली आहे. हर घर तिरंगा यात्रेसाठी सुमारे ८०० विध्यार्थ्यांना सामावून घेण्यात येईल.

हर घर तिरंगा रोड रनच्या पहिल्या तीन विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येईल. हर घर तिरंगा रोड रन आणि हर घर तिरंगा सायकल रॅलीमध्ये सर्व सहभागी
झालेल्यांना टी-शर्ट मिळेल तसेच आवश्यक अल्पोपाहाराचीही व्यवस्था  केली जाईल.

या रोड रेस आणि सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीनी १२ ऑगस्ट संध्या ४.०० वाजेपर्यंत क्यूआर कोड स्कॅनिंगवर नोंद करावी आणि क्रिडा आणि युवा व्यवहार खात्याच्या www.dsya.goa gov.in वरही उपलब्ध आहे. सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची सायकल आणावी, , असे कळवण्यात आले आहे.