Connect with us

गोवा खबर

पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Published

on

Spread the love

गोवा खबर : फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील  आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले, “नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तीमंत उदाहरण आहे! त्याने वेळोवेळी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये यशस्वी होऊन तो मायदेशी येत असल्याने भारत आनंदित झाला आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. यापुढेही अनेक उदयोन्मुख क्रीडापटूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तो प्रेरित करत राहील  आणि भारताचा अभिमान उंचावत राहील. @Neeraj_chopra1”