Connect with us

गोवा खबर

मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे 15.53 लाख थेट रोजगार निर्मिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  30 जून 2024 पर्यंत 1,40,803 आस्थापनांना स्टार्टअप म्हणून मान्यता दिली आहे. वर्ष 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू झाल्यापासून, मान्यताप्राप्त स्टार्टअप्सनी 15.53 लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

केंद्र सरकारने देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी तसेच स्टार्ट-अप आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. 19 फेब्रुवारी 2019 च्या जीएसआर अधिसूचना 127(E) अंतर्गत विहित केलेल्या पात्रता अटींनुसार उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत संस्थांना ‘स्टार्टअप’ म्हणून मान्यता दिली जाते.

Year Number of Direct Jobs Created by DPIIT

Recognised Startups

2016 306
2017 51,980
2018 1,00,646
2019 1,63,463
2020 1,81,404
2021 2,10,545
2022 2,74,685
2023 3,91,943
2024* 1,78,316
Total* 15,53,288

*As on 30th   June 2024