गोवा खबर : क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सकाळी 9.30 वाजता जुने सचिवालय पणजी ते आयनॉक्स आणि परत अशा रोड रेसचे आयोजन केले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून 3 वयोगटांमध्ये स्पर्धा होणार आहे. पहिला वर्ग 16 वर्षांखालील मुले आणि मुली, (स्पर्धकाचा जन्म 15 ऑगस्ट 2008 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा) यांच्यासाठी जुने सचिवालय ते आयनॉक्स आणि परत, दुसरा वर्ग 19 वर्षांखालील मुले आणि मुली, (स्पर्धकाचा जन्म 15 ऑगस्ट 2005 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा) यांच्यासाठी जुने सचिवालय ते कला अकादमी आणि परत आणि तिसरा खुला गट सर्व पुरूष आणि महिला, त्यांच्यासाठी जुने सचिवालय ते मिरामार आणि परत अशी धावण्याची स्पर्धा असणार आहे.
अधिक माहितीसाठी एपीईओ संजय के. शेटकर (9763086029) आणि प्रकाश सतरकर (9823269088) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.