Connect with us

गोवा खबर

शालान्त पूर्व आणि शालान्तोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्र, राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना-2024-25 आर्थिक वर्षासाठी 5 ऑगस्टपासून ऑनलायन अर्ज स्वीकारण्यात येतील, असे समाज कल्याण संचालनालयाने कळवले आहे.

समाज कल्याण संचालनालयातर्फे अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालान्त पूर्व आणि शालान्तोत्तर शिष्यवृती अशा केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. त्याचप्रमाणे शालान्त आणि उच्च माध्यमिक मंडळांच्या परीक्षेत उच्च गुणवत्ता मिळवलेल्या एससी आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित पुरस्कार योजना, गगन भरारी शिक्षा योजना, होम नर्सिंग अभ्यासक्रम शिक्षण घेणार्‍या एससी विद्यार्थ्यांसाठी कन्या धन योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना, एससी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी (पाचवी ते सातवी) सरल विद्या साहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.

सर्व संस्था, शाळांनी विद्यार्थ्यांना पात्रतेप्रमाणे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास कळवावे, इर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://cmscholarship.goa.gov.in वर भेट द्यावी, तसेच आवश्यक दाखल्यासह 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज अपलोड करावे, असे कळवण्यात आले आहे. सर्व शाळा, संस्था, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जांची तपासणी करून 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुपूर्द करणे आवश्यक असणार आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचा अकाऊंट दिला पाहिजे आणि तो आधार कार्डास जोडलेला असावा, तसेच आधार लिंक केल्याची पावती अपलोड केली पाहिजे, असे कळवण्यात आले आहे.

आर्थिक मागास वर्गांतील जे विद्यार्थी पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांनी आपण कोणत्या वर्ग/समाजाचा आहे, त्याची स्वत: हमी देणे गरजेचे आहे आणि आपण एससी/ओबीसी/एसटी समाजातील नसल्याचे नमूद करणे आवश्यक आहे.

केंद्र पुरस्कृत योजनेसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांवर असू नये. अर्ज अपलोड करण्यास कोणतीही तांत्रिक मदत पाहिजे असल्यास विद्यार्थ्यी व संस्थांनी 9423883386 या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक अधिकार्‍यांकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.