Connect with us

गोवा खबर

पालयेकरांचे यश अभिमानास्पद : तुळशीदास गावस

Published

on

कृष्णा पालयेकर यांचा गौरव करताना सरपंच तुळशीदास गावस. सोबत नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक, उद्योजक रुद्रेश नागवेकर, योगेश तळवणेकर, संस्थेचे अध्यक्ष महादेव गवंडी.
Spread the love
  • एमएच्या परीक्षेत गोव्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरव 

गोवा खबर : कृष्णा पालयेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या एमएच्या परीक्षेत गोव्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून पेडणेवासीयांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना त्यांनी अथक परिश्रमाने शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा आपली वेगळी चमक दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांचे हे यश अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन चांदेल हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गावस यांनी केले.

फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान पेडणेतर्फे पालयेकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने तुळशीदास गावस बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक, उद्योजक रुद्रेश नागवेकर, अन्न व पुरवठा खात्याचे साहाय्यक अधिकारी योगेश तळवणेकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी उपस्थित होते.

पालयेकर यांनी हा गौरव आपला एकट्याचा नसून प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी शिक्षण दिले त्या सर्व शिक्षकांचा सन्मान असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपल्या जडणघडणीत ज्यांचा मोठा खारीचा वाटा आहे ते आपले काका मेघश्याम पालयेकर यांना आपण हा गौरव समर्पित करत असल्याचे ते म्हणाले.

महादेव गवंडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योगेश तळवणेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.