गोवा खबर : उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनी बार्देश तालुक्यातील साल्वादोर द मुंद, पेन्ह द फ्रान्स, सांगोल्डा, पिळर्ण-मार्णा, साळगांव आणि सुकूर पंचायत क्षेत्रातील रस्त्यांवर नो पार्किंग भाग अधिसूचित केला आहे.

पर्वरी बाजार ते आराडी जंक्शनपर्यंतच्या रस्त्यावर (650 मीटर) दोन्ही बाजूने, सुकूर चर्च जंक्शनपासून 800 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने, वेताळ राष्ट्रोळी हनुमान गणपती देवस्थान ते राष्ट्रोळी वेताळ पेड-कदंब डेपो रस्त्यावर 600 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने, चॉपस्टिक जंक्शन ते आर्ट पार्क जंक्शन रस्त्यावर 400 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने, राष्ट्रोळी वेताळ पेड ते चॉपस्टिक जंक्शन रस्त्यावर 950 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने, आल्त स्पोर्ट क्लब जंक्शन ते सरकारी प्राथमिक शाळा जंक्शन रस्त्यावर 550 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने, सरकारी प्राथमिक शाळा चार रस्ते जंक्शन ते मारुती देवस्थान जंक्शन रस्त्यावर 600 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने तसेच मारुती देवस्थान जंक्शन ते हिरो होंडा जंक्शन रस्त्यावर 1200 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने आणि डीआयईटी कॉलेज जंक्शन ते डब्ल्यूआरडी ऑफिस जंक्शन सर्व्हिस रस्त्यावर 1000 मीटरपर्यंत दोन्ही बाजूने नो पार्किंग भाग अधिसूचित करण्यात आला आहे. तसेच आवश्यक ते सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कळवण्यात आले आहे.