Connect with us

गोवा खबर

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकारच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळण्यात येणार आहे. पर्वरी सचिवालय प्रकल्पात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे लोकमान्य टिळकांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करणार आहेत.

मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे कार्यक्रम

मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या वतीने 1 रोजी सकाळी 11 वाजता सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवप्रभाचे संपादक परेश प्रभू हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश वंसकर, सुहासिनी प्रभुगावकर आणि किशोर शेट मांद्रेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

खांडोळा येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उप प्राचार्य, मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी विभागांचे विद्यार्थी कार्यक्रमास हजर राहणार आहेत. विद्यार्थ्यांना साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.