Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गोंय विनामूल्य वीज येवजण’ सुरू

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा उर्जा विकास संस्था, न्यू आणि रिनेवेबल ऊर्जा विभाग आणि विद्युत खाते यांच्या वतीने पर्वरी येथील सचिवालयात आयोजित कार्यक्रमात ‘गोंय विनामूल्य वीज येवजण’ चा शुभारंभ केला.

गोव्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्याची गरज व्यक्त करून डॉ. सावंत यांनी अधिकाधिक ग्राहकांना लाभ मिळावा यासाठी या योजनेचा विस्तार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि ग्राहकांच्या फयद्यासाठी योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रे सुलभ करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी वीजमंत्री रामकृष्ण ढवळीकर, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.

या योजनेच्या लाभांमध्ये योजनेसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शून्य वीज बिल, गेल्या वर्षभरात ४०० युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरणाऱ्या व थकबाकीदार नसलेल्या निवासी ग्राहकांसाठी ५ किलोवॅटपर्यंतचा निवासी सौर ऊर्जा प्रकल्प मोफत बसविण्यात येईल. या रहिवासी ग्राहकांकडे आवश्यक क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी पुरेसे छताचे क्षेत्र असले पाहिजे. ही योजना पंतप्रधान सूर्यघर मुफ्ती बिजली योजनेच्या सर्व विद्यमान आणि नवीन लाभार्थ्यांना लागू आहे.

‘गोंय विनामूल्य वीज योजनेची गोवा उर्जा विकास संस्थेद्वारे नोंदणीकृत आस्थापनां मार्फत अंमलबाजावणी करण्यात येते. रूफ टॉप सोलर प्लांटसाठी ग्राहकांच्या आवारात स्थापित केलेली सर्व उपकरणे गोवा उर्जा विकास संस्थेची मालमत्ता राहतील.

याप्रसंगी डॉ. सावंत यांनी गोव्यातील लाभार्थ्यांना पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचे राज्य अनुदान वाटप केले. मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी पंतप्रधानांनी विविध आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये आणि संमेलनांमध्ये हवामान बदल कमी करण्यास मदत करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अशा उपक्रमांच्या शुभारंभाद्वारे केली जात आहे, असे सांगितले.