Connect with us

गोवा खबर

कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत मे 2024 मध्ये 23.05 लाख नवीन कामगारांची नोंदणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : कर्मचारी राज्य विमा योजनेच्या तात्पुरत्या वेतनश्रेणी माहितीपटावरून मे 2024 मध्ये 23.05 लाख नवीन कर्मचारी त्यात समाविष्ट झाले असल्याचे दिसून आले आहे

मे 2024 मध्ये 20,110 नवीन आस्थापना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत ज्यामुळे अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे सुनिश्चित करता येईल.

प्रतिवर्ष विश्लेषणानुसार मे २०२३ च्या तुलनेत यातील निव्वळ नोंदणीमध्ये 14% वाढ झाली आहे.

 प्रतिवर्ष तुलना
Head मे 2023 मे 2024 वाढ
नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या 20.23 लाख 23.05 लाख 2.82 लाख

 

 प्रतिमहिना तुलना
 Head एप्रिल 2024 मे 2024 वाढ
महिनाभरातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या 16.47 लाख 23.05 लाख 6.58 लाख

 

प्रतिमहिना तुलना
Head एप्रिल 2024 मे 2024 वाढ
नव्याने नोंदणीकृत झालेल्या आस्थापनांची संख्या 18,490 20,110 1,620

 

वेतनपटातरील  माहितीद्वारे, हे लक्षात येते की या महिन्यादरम्यान नोंदणीकृत एकूण 23.05 लाख कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी झाली,यापैकी 11.15 लाख कर्मचारी 25 वर्षे वयोगटातील आहेत, तसेच एकूण नोंदणीतील हे प्रमाण सुमारे 48.37% आहे,

तसेच, वेतनपटाचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते, की मे 2024 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 4.47 लाख आहे. याशिवाय, एकूण 60 पारलिंगी कर्मचाऱ्यांनी मे 2024 मध्ये कर्मचारी राज्य  विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.