Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रीय महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे.. महाराष्ट्रात सर्वाधिक 750 चार्जिंग स्टेशन्स आहेत.

देशात राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या 5293 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा राज्यवार तपशील परिशिष्ट-अ मध्ये दिला आहे. यामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया अंतर्गत उभारण्यात आलेल्या 4729 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचा समावेश असून, त्यासाठी रु. 178 कोटी खर्च करण्यात आले.

याव्यतिरिक्त, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया अंतर्गत तीन तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्याने (OMCs) उभारण्यात येणाऱ्या एकूण 7432 ईव्ही चार्जिंग स्टेशनपैकी, 5833 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, देशातील महामार्गांलगत उभारण्याचे अवजड उद्योग मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

या 5833 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची राज्यनिहाय यादी परिशिष्ट-ब मध्ये दिली आहे. या तेल कंपन्यांना 7432 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी, भांडवली अनुदान म्हणून, 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत, वरील ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससाठी राष्ट्रीय महामार्गांलगत कोणतेही ऊर्जा केंद्र उभारण्याची सरकारची योजना नाही.

परिशिष्ट-अ

State/UTs Number of EV charging Stations on National Highways
Andaman & Nicobar 1
Andhra Pradesh 249
Arunachal Pradesh 30
Assam 147
Bihar 96
Chhattisgarh 116
Delhi 10
Goa 33
Gujarat 259
Haryana 284
Himachal Pradesh 68
Jammu & Kashmir 60
Jharkhand 87
Karnataka 300
Kerala 138
Ladakh 2
Maharashtra 750
Manipur 27
Meghalaya 35
Mizoram 8
Madhya Pradesh 231
Nagaland 13
Odisha 189
Pondicherry 2
Punjab 195
Rajasthan 482
Sikkim 3
Tamil Nadu 369
Telangana 221
Tripura 24
Uttar Pradesh 577
Uttarakhand 79
West Bengal 208
Grand Total 5293

 

परिशिष्ट-ब

State Number of Charges on Highway
Andhra Pradesh 319
Arunachal Pradesh 5
Assam 59
Bihar 139
Chandigarh 5
Chhattisgarh 70
Delhi 25
Goa 24
Gujarat 420
Haryana 261
Himachal Pradesh 53
Jammu & Kashmir 72
Jharkhand 105
Karnataka 471
Kerala 189
Madhya Pradesh 231
Maharashtra 659
Manipur 1
Meghalaya 27
Mizoram 7
Nagaland 6
Odisha 190
Pondicherry 16
Punjab 272
Rajasthan 439
Sikkim 1
Tamil Nadu 649
Telangana 244
Tripura 1
Uttar Pradesh 525
Uttarakhand 27
West Bengal 321
Grand Total 5,833

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.