Connect with us

गोवा खबर

मांद्रे येथील सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार

Published

on

Spread the love
मांद्रे सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेला प्रारंभ
गोवा खबर:मांद्रे पंचायत क्षेत्रात सार्वजनिक स्मशानभूमीची आवश्यकता ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्त केली होती. मात्र आजवर तोंडी आश्वासने लोकांना मिळाली परंतु सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी अखेर हा प्रश्न सोडविण्याचे शिवधनुष्य उचलून प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांनी सरकारकडे जूनसवाडा मांद्रे येथे सरकारी जागा पंचायतीला देण्याची मागणी कायदेशीर प्रक्रियेनुसार केली आहे.
यासंदर्भात सरपंच प्रशांत नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंचायत संचालनालयाकडे पंचायत संचालकाला पत्र लिहून भू संपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याच महिन्यात पत्रव्यवहार केला असून याच्या प्रती गटविकास अधिकारी पेडणे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महसूल विभाग मंत्री अतानासियो मोन्सेरेत आणि आमदार जीत आरोलकर यांना दिल्या आहेत.
सार्वजनिक स्मशानभूमीसाठी सरकारी जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया करण्यासाठी पंचायत संचालनालयाला अर्ज केला आहे. अर्ज करण्यापूर्वी विभागाच्या भेटी घेऊन त्यांना समस्या कथन केल्या तसेच मंत्र्यांनाही यासंदर्भात माहिती दिल्याचे सरपंच नाईक यांनी सांगितले.