गोवा खबर: हिंदु राष्ट्र अर्थात धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी ‘सनातन संस्थे’च्या वतीने यंदा रविवार, २१ जुलै २०२४ या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री नवदुर्गा सभागृह, बोरी, फोंडा येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन); समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार; तसेच ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !’ या विषयवरही मान्यवर वक्त्याचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.