Connect with us

गोवा खबर

दिव्यांगांना मोफत उपकरणे देण्यासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिव्यांगांना मोफत उपकरणे देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे असे सांगितले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाखाली दिव्यांग व्यक्तींसाठी निओ फ्लाय आणि निओ निओ बोल्ट कंपनीच्या  एकूण ३२ इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे वाटप केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी संजय स्कूल फॉर स्पेशल एज्युकेशन सेंटरमधील विशेष विद्यार्थ्यांना आवाजाची सुविधा असलेल्या १२ टॅब्लेटचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी एचपीसीएलच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि रेट्रोफिट केलेल्या दुचाकी दिव्यांग व्यक्तींमध्ये अधिक स्वातंत्र्य वाढवतील यावर भर दिला. त्यांनी विविध दिव्यांग लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही दिली.

समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी एचपीसीएलच्या पुढाकाराबद्दल पेट्रोलियमचे आभार व्यक्त केले. त्यांनी शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मोबाईल शॉप मालक इरफान यांचा उल्लेख करून रेट्रोफिट केलेल्या दुचाकीमुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवास करताना इतरांवर अवलंबित्व राहणे कमी करून स्वावलंबी बनण्यास मदत होईल हे पटवून दिले.

यावेळी विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर, आमदार डॉ. देविया राणे, श्री चंद्रकांत शेट्ये, श्री प्रेमेंद्र शेट, श्री दिगंबर कामत, श्री दाजी साळकर, समाज कल्याण सचिव, श्री ई. वल्लवन, अपंग व्यक्तीं गोवा राज्य आयुक्त श्री गुरुप्रसाद पावसकर आणि सचिव, गोवा राज्य अपंग व्यक्ती आयुक्त  श्री ताहा हाझिक, सीएसआर आणि पीआर, सीसीचे श्री राजीव गोयल, सीएसआर आणि पीआर, सीसीचे कार्यकारी संचालक पेंदोर बाबा, सीएसआरचे महाव्यवस्थापक श्री शशांक तिवारी, आणि सीएसआरच्या सहाय्यक व्यवस्थापक मिस श्रुती पालन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.