Connect with us

गोवा खबर

कुंकळ्ळी बंड तरुणांना नेहमीच प्रेरणा देईल: सुभाष फळदेसाई

Published

on

Spread the love

गोवा खबर:  समाजकल्याण मंत्री श्री.सुभाष फळदेसाई यांनी ५ जुलै १५८३ मध्ये कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज राजवटीविरुद्ध १६ नायकांनी केलेल्या कुंकळ्ळी बंडाच्या इतिहासातून गोव्यातील युवकांना हे राज्य अधिक समृद्ध, आत्मनिर्भर बनविण्यासाठी सदैव प्रेरीत करील असे सांगितले आणि भविष्यात विकसीत भारतचे उद्दीष्ट गाठण्यास मदत होईल असे सांगितले. कुंकळ्ळी येथे  कुंकळ्ळी बंडाच्या नायकांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते.

श्री. फळदेसाई यांनी वसाहतवादी राजवटीविरुद्ध १६ नायकांनी केलेल्या कुंकळ्ळी बंडाला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात खूप महत्त्व आहे. हे बंड हे देशातील परकीय राजवटीविरुद्धचे पहिले बंड आहे. इयत्ता नववी आणि अकरावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कुंकळी बंडाचा इतिहास समाविष्ट करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.

श्री. फळदेसाई यांनी १५ जुलै रोजी राष्ट्रीय स्मारक, दिल्ली येथे आदरांजली अर्पण करून नायक हुतात्मा दिन राष्ट्रीय स्तरावर साजरा केल्याबद्दल डॉ. सावंत सरकारचे कौतुक केले. १५ जुलै रोजी कुंकळ्ळी येथे नायक बंड स्मरणोत्सव हा गेल्या तीन वर्षांपासून राज्य कार्यक्रम म्हणून घोषित करण्यात आला आहे.

भारतीय लोकसंख्येच्या ६५% पेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये युवा शक्तिचा समावेश आहे आणि देशाच्या विकासासाठी या युवा शक्तिचा योग्य वापर करण्याची गरज आहे.  गोवा अधिक समृद्ध, आत्मनिर्भर बनविण्यासाठी तरुणांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध लढा देण्याची गरज आहे असे श्री. फळदेसाई म्हणाले.

 याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश श्री. एडगर फर्नांडिस यांना सामाजिक उन्नती आणि प्रामाणिक सेवेसाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कुंकळ्ळी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. तुळशीदास देसाई यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कुंकळ्ळी श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आणि श्रीमती. श्रीमती डेलिया परेरा यांना बँकर म्हणून त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल ‘कुंकळी ज्योती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पत्रकार श्री. रमेश राऊत नाईक यांना कुंकळी मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

        नावेलीचे आमदार श्री उल्ल्हास तुयेंकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्री. अश्विन चंद्रू, आयएएस, पोलीस अधिक्षक, दक्षिण गोवा श्रीमती. सुनीता सावंत, कुंकळी चीफटेन्स मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. ऑस्कर मार्टिन्स, गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहिदास देसाई व इतर यावेळी उपस्थित होते.