- मोबाईल फोनची सेवा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी यात्रेच्या मार्गात उभारली 31 नवी ठिकाणे.
- यात्रेकरूंसाठी मोबाईल सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने उघडली सिमकार्ड वितरण केंद्रे.
- लखनपूर ते काझीगुंड आणि काझीगुंड ते पहलगाम आणि बालताल या मार्गांवर अनेक ठिकाणी 5जी सेवा उपलब्ध करून देण्यासह या संपूर्ण मार्गावर केली मोबाईल सेवा उपलब्ध.
गोवा खबर : अमरनाथ यात्रा 2024 मध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरूंसाठी मोबाईल फोनची सेवा सुरळीतपणे उपलब्ध असेल याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) दूरसंचार सेवा विषयक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणांची घोषणा केली आहे.
यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंना अखंडितपणे मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएनएल, एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांसह इतर महत्त्वाच्या सेवा पुरवठादारांच्या (टीएसपीज) सहयोगातून संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
वाढीव संपर्क सुविधा:
- मोबाईल सेवा परिचालनाच्या सुनिश्चितीसाठी यात्रा मार्गावर एकूण 82 ठिकाणे (बीएसएनएल, एअरटेल आणि आरजेआयएल) कार्यरत करून देण्यात आली आहेत.
- अमरनाथ यात्रेच्या मार्गावर एकूण 31 नवी कार्यस्थळे उभारण्यात आली असून त्यामुळे 2023 मध्ये कार्यरत असलेल्या एकूण 51 कार्यस्थळांची संख्या वाढून 2024 मध्ये 82 झाली आहे. यात्रेकरू तसेच त्या भागातील सर्वसामान्य नागरिक यांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सुधारणा करण्यात आली आहे.
- लखनपूर ते काझीगुंड आणि काझीगुंड ते पहलगाम आणि बालताल या मार्गांवर सर्व ठिकाणी आता 2जी, 3जी आणि 4जी सेवा उपलब्ध झाली असून या मार्गांवर अनेक ठिकाणी यात्रेकरू तसेच सामान्य जनतेसाठी 5जी तंत्रज्ञान देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- यात्रेकरुंपर्यंत दूरसंचार सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने मार्गावरील आधीच्या ठिकाणांसह पुढील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर सिम कार्ड्स वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत: लखनपूर, भगवती नगर येथील यात्री निवास, चंदरकोट, अनंतनाग, श्रीनगर, श्रीनगर विमानतळ, पहलगाम, सोनमर्ग आणि बालताल.
अमरनाथ यात्रा 2024 च्या काळात सातत्यपूर्ण मोबाईल सेवेची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने टीएसपीजनी खालील पद्धतीने बीटीएसची उभारणी केली आहे.
- सेवा पुरवठादार-स्थान सेवा पुरवठादार-स्थान संपर्क स्थळांची निश्चिती
- बेस कॅम्प (पहलगाम आणि बालताल) ते पवित्र गुहा
| सेवा पुरवठादार कंपनी |
कार्यस्थळे (ठिकाणे) |
| एअरटेल |
19 ठिकाणी 2जी, 4जी आणि 5जी सेवा उपलब्ध |
| बीएसएनएल |
27बीटीएसएसवर 2जी,3जी तसेच स्वदेशी 4जी सेवा उपलब्ध |
| आरजेआयएल |
36 ठिकाणी 4जी, 5जीसेवा उपलब्ध (30 ठिकाणी 4जी आणि 5जी सेवा तर 06 ठिकाणी 4जी सेवेची उपलब्धता) |