गोवा खबर:निर्लज्ज भाजपने पुन्हा एकदा खोटेपणा पसरवून गोमंतकीयांना भेडसावणाऱ्या मूळ समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही पुन्हा एकदा मागणी करतो की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, आसगाव घर मोडण्याच्या प्रकरणातील डीजीपी आणि भाजपचा संबंध, गोव्यातील बेरोजगारी, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय वाढणे, जमीन रुपांतरणे आणि गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांच्या गोव्याने आपली संस्कृती आणि ओळख गमावली आहे ह्या विधानावर बोलले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षअमित पाटकर यांनी सोशल मिडीया वरून केली आहे.