Connect with us

गोवा खबर

मंदिरांच्या १०० मीटर परिसरात दारूच्या दुकानांना अनुमती देण्याच्या सरकारचा निर्णयाचा निषेध

Published

on

Spread the love

गोवा खबर: शाळा किंवा मंदिरे यांच्या १०० मिटर अंतरात वाढीव शुल्क आकारून अनुमती देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. रामनाथी, फोंडा येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे आणि सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘कॅसिनोमुळे युवा पिढी बरबाद होत आहे आणि आता शाळा आणि मंदिरे यांच्या १०० मिटर अंतरावर दारूच दुकाने चालू करणे कितपत योग्य ठरणार आहे? हिंदु भाविक जर दारूच्या आहारी गेल्यास तो मंदिरात जाणार का? सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्र वृद्धींगत होणार आहे का? महसुलात वृद्धी करायची असल्यास गोवा सरकारने उत्तरप्रदेश सरकारप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडोर, अयोध्या, मथुरा आदींच्या माध्यमांतून धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना दिलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारला आज पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो आणि पर्यटन क्षेत्रात उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे.

 

गोव्यात प्राचीन मंदिरे, संस्कृती असतांना दारूच्या माध्यमातून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला निर्णय निदंनीय आहे. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही गोवा सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो आणि गोवा सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा. आज भारतातील अन्नपदार्थांस प्रमाणिकरण देणारी संस्था ‘FSSAI’ यांच्या आदेशानुसार शाळाच्या जवळ फास्ट फूड विक्र उभारता येता नाही. शाळांच्या परिसरात फास्ट फूडला विक्री केंद्राला विरोध करणारी सरकार दारूच्या विक्रीच्या दुकानांना कशी परवानगी देते?