Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना बकरी- ईदच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहाच्या (बकरी ईदच्या) हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, मी गोव्यातील लोकांना विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद-उल-जुहाच्या (बकरी ईदच्या) हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.ईद-उल-जुहा हा पवित्र सण भारताच्या कोट्यवधी मुस्लिमांद्वारे साजरा केला जातो. हा सण आम्हाला त्याग, करुणा आणि बंधुता या मूल्यांची आठवण करून देतो, आणि ही मुल्ये आपल्याला शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक जगाच्या उभारणीसाठी आवश्यक आहेत.
 पुढे राज्यपाल म्हणतात की, गोव्याला शांतता आणि जातीय सलोख्याचा समृद्ध आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. ही अनोखी परंपरा अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मला आशा आहे की यंदाचा ईद-उल-जुहा हा उत्सव या उदात्त हेतूला आणखी हातभार लावेल असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.