Connect with us

गोवा खबर

जी.किशन रेड्डी यांनी आज कोळसा आणि खाण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज कोळसा आणि खाण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. माजी केंद्रीय कोळसा,खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जी.किशन रेड्डी यांच्याकडे पदभार सोपवला. यावेळी कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे हे देखील उपस्थित होती.राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी याआधीच 11 जून 2024 रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 

जी.किशन रेड्डी यांनी आज पदभार स्विकारला त्यावेळी खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव, कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृतलाल मीणा आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर जी. किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही संवाद साधला. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल तसेच देशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. कोळसा आणि खाण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कोळसा आणि खाण या दोन्ही मंत्रालयाचे कामकाज आपण अत्यंत निर्धाराने, निष्ठेने, समर्पण वृत्तीने, प्रामाणिकतेने आणि पारदर्शकतेने करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.