गोवा खबर:जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे रसायन व खते मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारण्याच्या प्रसंगी रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल देखील उपस्थित होत्या.
जे पी नड्डा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर खते, औषधे, रसायन आणि पेट्रोकेमिकल्स सचिवांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांना सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली गेली.
