गोवा खबर:गोवा सरकारने ७ में २०२४ हा गोवा राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी ‘मतदानाचा दिवस’ म्हणून भरपगारी सुटी जाहीर केली आहे.
गोवा राज्यातील औध्योगिक कामगार, सरकारी खात्यांतील रोजंदारीवरील कामगार, सर्व खाजगी अस्थापने तसेच उध्योग, व्यापार क्षेत्रातील रोजंदारीवरील व सामान्य कर्मचाऱ्यांना ही भरपगारी सुट्टी लागू असेल.