Connect with us

गोवा खबर

५ ते ८ मेंपर्यंत १४४ कलम लागू

Published

on

Spread the love

गोवा खबर: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मतदार संघात ५ में रोजी संध्या ६ वाजल्यापासून ते ८ में रोजी संध्या ६ वाजेपर्यंत पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यास किंवा कोपरा बैठका आयोजित करण्यास बंदी लागू केली आहे.

त्याचप्रमाणे पैशांचे वाटप किंवा दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेली वाहने सोडून उमेदवाराना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच मतदारांना कोणतेही आमिष दाखविण्याचे टाळण्यासाठी खाजगी वाहनांचीही तपासणी होईल. कामावरील सार्वजनिक नोकर, मान्यता असलेल्या विवाह किंवा अंतयात्रेस किंवा इतर खास प्रसंगांसाठी बंदी लागू नाही.