गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या 24 एप्रिल 2024 रोजी आपला वाढदिवस साजरा करणार असून, जनतेच्या शुभेच्छा घेण्यासाठी दिवसभर विविध ठिकाणी उपलब्ध असतील.
सकाळी 8 ते 9 या दरम्यान मुख्यमंत्री आपल्या हाऊसिंग बोर्ड साखळी येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारतील. सकाळी 10 ते दुपारी 12 या दरम्यान मडगाव येथील कदंब बस स्थानकासमोरील भाजपा दक्षिण गोवा कार्यालयात मुख्यमंत्री हजर असतील. दुपारी 1 ते 3 या दरम्यान आल्तिनो येथील श्री महालक्ष्मी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उपलब्ध असतील. संध्याकाळी 5 ते रात्री 8 या दरम्यान म्हापसा येथे भाजपाच्या उत्तर गोवा पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री शुभेच्छा स्वीकारतील, असे कळवण्यात आले आहे.