खासदारनिधीचा वापर करताना कधीच भेदभाव केला नाही: श्रीपाद नाईक
गोवा खबर: पंधरा वर्षें मला केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला लाभली. खासदार निधीचा विनियोग करताना मी कधीच भेदभाव केला नाही. आरोग्य व शिक्षणाला नेहमी प्राधान्य दिले. हजाराहूनही अधिक विकासकामें करण्याची मला संधी मिळाली. मोठ मोठे प्रकल्प मला गोव्यात आणता आले, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
वाळपई येथे भाजपाच्या कार्यालयात नगरगांव पंचायत क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते आणि महिला मोर्चाला संबोधित करतना श्री. नाईक बोलत होते. या प्रसंगी गोव्याचे आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे, पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, वाळपईचे माजी आमदार नरहरी हळदणकर व मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वाळपई मतदारसंघात श्रीपाद नाईक यांनी तीन सभांना संबोधित केले. तिन्ही सभांना प्रचंढ प्रतिसाद लाभला. उद्या दि. २२ रोजी ते पर्ये मतदार संघाचा प्रचार दौरा करणार आहेत.
जनता जनार्दनाने मला जी शक्ती दिली, जे अधिकार दिले, त्यामुळेच मी उत्तर गोव्यात अनेक विकस कामे करू शकलो. अनेक मोठे प्रकल्प गोव्यात आणू शकलो. पण जे घराबाहेर पडत नाही, त्यांना ही विकसकामे कशी दिसणार ? असा खोचक सवाल श्री. नाईक यांनी यावेळी केला.
श्रीपाद नाईक यांना सत्तरीतून मोठी आघाडी देऊ : विश्वजित राणे
सगळ्यात अधिक मतदान सत्तरीत झाले, याचा प्रतिध्वनित केंद्रात उमटायला हवा. आमचा अधिक विकास व्हायचा असेल, सत्तरीचा अधिक विकास व्हायचा असेल तर श्रीपाद नाईक यांना मोठे मताधिक्क्य मिळवून देण्याची गरज आहे. आम्ही सगळे संघटित आहोत हे दाखवून देण्याची गरज आहे. श्रीपाद नाईक हे चांगले व्यक्तिमत्व आहे, त्यांना मतदान करणे म्हणजेच मोदींजींना मतदान करण्यासारखे आहे. त्यांना सत्तरीतून मोठी आघाडी देण्यासाठी आम्ही सगळे मिळवून देण्यासाठी काम करू, असे गोव्याचे आरोग्य मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांनी सांगितले.
उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा निवडणूक लढविणारे श्रीपाद नाईक यांनी ब्रम्हदेव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळ वाळपईचे माजी आमदार नरहरी हळदणकर आणि भाजपाच्या कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी वाळपईच्या भाजपा कार्यालयात नगरगांव पंचायत क्षेत्रातील कार्यकत्यांना आणि नारीशक्तीला संबोधित केले.
सत्तरीचा झपाट्याने विकास होत आहेत. मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झालेली आहे. यात नवीन महाविद्यालय, आयनोक्सच्या धरतीवर मिनी थिएटर, खेळाचे मोठे मैदान, जलतरण तलाव आदिंचा समावेश आहे, अशी माहिती विश्वजित राणे यावेळी बोलताना दिली.
त्यानंतर वेळगे येथील शांतादुर्गा सभागृहात व सावर्डे, वाळपई येथील सरकारी उच्च विद्यालयाजवळ झालेल्या भव्य सभांना उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. तिन्ही सभांना वाळपई मतदार संघातील नारीशक्तीचे दर्शन घडले.
वेगळे येथील शांतादुर्गा सभागृहात व नंतर सावर्डे येथील सरकारी हाय स्कूल जवळ संपन्न झालेल्या सभेला आमदार विश्वजित राणे, माजी आमदार नरहरी हळदणकर यांच्या व्यतिरिक्त सरपंच नरेश गावकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती राजश्री काळे, वाळपईचे प्रभारी विनोद शिंदे, सातेरी देवस्थान समितीचे अध्यक्ष काशिनाथ गावकर, केळबाय देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद गावकर, सावर्डेचे सरपंच्या श्रीमती उज्वला गांवकर, उप-सरपंच शिवाजी देसाई व अन्य पंच सदस्य उपस्थित होते.