गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर यांनी मतदान पक्ष, निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, सेक्टर मॅजिस्ट्रेट, भरारी पथक, एआरओ, एईआरओ आणि इतर निवडणूक संबंधित कर्मचाऱी म्हणजे खाजगी व्यक्ती आणि निम-सरकारी कर्मचारी मतदानाच्या दिवशी (मतदान पक्षांव्यतिरिक्त) निवडणुकीच्या कामात गुंतलेले आणि पोलीस कर्मचारी, गोवा आयआरबी आणि होमगार्ड जे निवडणूक कामावर आहेत त्या मतदारांच्या मतदानाचे वेळापत्रक सुविधा केंद्रांवर खालीलप्रमाणे अधिसूचित केले आहे.

३० एप्रिल २०२४, २ मे २०२४ आणि ३ मे २०२४ रोजी धेंपे कला आणि विज्ञान महाविध्यालय मिरामार पणजी-गोवा येथे मतदान पक्षांसाठी सुविधा केंद्राची व्यवस्था केली आहे..
३, ४ आणि ५ मे रोजी निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांसाठी, सेक्टर मॅजिस्ट्रेट, भरारी पथक, एआरो, एईआरओ आणि इतर निवडणुकीच्या कामात गुंतलेले संबंधित कर्मचाऱ्यासाठी इंस्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा हॉल, पणजी, पहिला मजला, लहान हॉल (बी) मध्ये सुविधा केंद्राची व्यवस्था केली आहे.
३, ४ आणि ५ मे रोजी पोलिस कर्मचाऱी, गोवा आयआरबी आणि होमगार्डसाठी इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा हॉल, पणजी, पहिला मजल्यावरील मोठा हॉल (ए) मध्ये सुविधा केंद्राची व्यवस्था केली आहे.