Connect with us

गोवा खबर

राज्यातील पर्यटन बळकट करण्यासाठी पर्यटन विभाग, गोवा सरकार आणि मास्टरकार्ड यांच्यात  धोरणात्मक सहकार्य करार

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर: Panaji, 3rd April 2024 – नावीन्यपूर्ण अशा ‘अमूल्य भारत’ अर्थात प्राइजलेस इंडिया या पटलाद्वारे  गोव्यात अंतर्गामी आणि देशांतर्गत पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने मास्टरकार्ड सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

 

हा सहयोग गोव्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून पुढे आणण्यास अत्यंत प्रभावी ठरणार आहे कारण मास्टरकार्डच्या प्राइजलेस इंडिया या पटलाच्या सहाय्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी अनोखे, आकर्षक अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता येतील.

 

श्री सुनील अंचिपाका, IAS, संचालक, पर्यटन विभाग आणि व्यवस्थापकीय संचालक, गोवा पर्यटन विकास महामंडळ या प्रसंगी बोलताना म्हणाले, “मास्टरकार्ड सोबतची भागीदारी प्रमोशनच्या पलीकडे जाते कारण ती अस्सल आणि संस्मरणीय अनुभव शोधणाऱ्या प्रवाशांच्या विशाल जागतिक नेटवर्कसाठी दरवाजे खुले करते. धोरणात्मक विपणन उपक्रम आणि अनेक वाहिन्यांवरील लक्ष्यित आउटरीच प्रयत्नांद्वारे, गोवा पर्यटन प्रभावीपणे या प्रदेशाला उच्च-स्तरीय प्रवासाचे स्थळ म्हणून प्रोत्साहन देऊ शकते, प्रवाशांच्या कल्पनाशक्तीचा वेध घेते आणि पर्यटकांच्या गोव्यातील शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यास प्रेरित करते.”

श्री गौतम अग्रवाल, विभाग अध्यक्ष, दक्षिण आशिया मास्टरकार्ड म्हणाले “गोवा भारतातील एक अग्रणी पर्यटन आकर्षण आहे. हे धोरणात्मक सहकार्य गोव्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आकर्षण वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मास्टरकार्डच्या प्रख्यात प्राइसलेस इंडिया या पटलाचा लाभ घेऊन राज्यातील विशेष प्रवासी अनुभव क्युरेट केले जातील. या भागीदारीद्वारे, दोन्ही संस्था गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, निसर्गरम्य लँडस्केप आणि जागतिक स्तरावर प्रवाशांना उत्साही आदरातिथ्य देण्यासाठी वचनबद्ध आहेत. या संधीचा उपयोग मास्टरकार्ड राज्यात सुरक्षित डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देखील करेल.”

Goa Tourism Department
केपे आणि धारबांदोडा येथे आज शिगमोत्सव!

या भागीदारीअंतर्गत, मास्टरकार्ड आपल्या प्राइसलेस इंडिया या पटलाचा वापर करून विविध प्रकारचे पर्यटन विषय आणि प्रवासाचे अनुभव क्युरेट करेल, त्याचबरोबर भारतातील देशांतर्गत आणि अंतर्गामी पर्यटनाला चालना देण्यासाठी आपल्या पटलाचा जगभरातील प्रवाश्यांना गोव्याच्या अनोख्या ऑफरचे प्रदर्शन घडवण्यासाठी आणि  लक्ष्यित विपणन आणि प्रचारात्मक मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

मास्टरकार्डच्या  प्राइसलेस इंडिया पटलावरून त्यांच्या कार्डधारकांना ४० हून अधिक देशांमध्ये योग्य पर्यटन अनुभव मिळतो. त्याचबरोबर २००० हून अधिक अनुभवांसह, कार्डधारकांकडे जगातील सर्वात रोमांचक स्थळांमधून निवडण्यासाठी अनेक ऑफर आहेत. खरं तर, कार्डधारक त्यांच्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ऑफर आणि फायदे वैयक्तिकृत करू शकतात.