Connect with us

गोवा खबर

कॅन्सर जागृतीवर व्याख्यान

Published

on

Spread the love

गोवा खबर:मिरामार येथील गोवा सायन्स सेंटरने ७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोवा सायन्स सेंटर, मिरामार येथील ऑडिटोरियममध्ये संध्याकाळी ४.०० वाजता कॅन्सर जागृतीवर लोकप्रिय विज्ञान व्याख्यान आयोजित कले आहे. कॅन्सर शस्त्रक्रिया, लाइफ सपोर्ट कोर्स, पॅलिएटिव्ह केअर आणि योग थेरपीचे प्रशिक्षण घेतलेले जनरल सर्जन डॉ. सीताकांत एन. कामत घाणेकर यांचे व्याख्यान होणार आहे.

सर्व प्रकारचे कर्करोग प्रतिबंध आणि लवकर ओळखणे, कर्करोगाचे सामान्य/सात संकेत, स्तनाचा कर्करोग (स्वतः स्तन तपासणी) आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यावर व्याख्यान दिले जाईल.

व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. नोंदणी लिंक https://forms.gle/PsocBnsGRoTEXGak6 हे आहे. अधिक माहितीसाठी gsconlineactivities@gmail.com वर संपर्क साधा किंवा ०८३२-२४६३४२६ वर कॉल करा.