गोवा खबर:डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाने उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या सहकार्याने ४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून सांखळी येथील सरकारी महाविध्यालयात उत्सव २०२४ हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्याचप्रमाणे सांखळी रवींद्र भवन ते सांखळी येथील सरकारी महाविध्यालयापर्यंत सकाळी ९.४५ वाजता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.