गोवा खबर:भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रातील एक प्रमुख सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या उपक्रमाच्या तळोजा शाखेने आज गोव्यामध्ये बांबोलिम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला कर्करोग निदान करण्याची सोय असलेले एक फिरते वाहन भेट दिले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला बीईएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश श्रीवास्तव आणि बीईएलचे (एचआर) संचालक विक्रमन एन. उपस्थित होते.


Goa Tourism Department
पर्वरीत आज शिगमोत्सव!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वाहनामध्ये, रुग्णांना सर्वसमावेशक कर्करोग निदान सेवा पुरवण्यासाठी ऍनालॉग मॅमोग्राफी, डिजिटल एक्स रे, पोर्टेबल अल्टासाऊंड, डिजिटल ईसीजी, हेमॅटोलॉजी विश्लेषण, बायोकेमिस्ट्री विश्लेषण, डिजिटल सूक्ष्मदर्शक आणि क्रायो शस्त्रक्रिया क्षमतेसह आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. हे फिरते वाहन, गोव्यामधील विविध गावांमध्ये प्रवास करून कर्करोगाच्या लक्षणांचे वेळेवर निदान करून महत्त्वाच्या वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन करून हजारो लोकांचे जीव वाचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.