गोवा खबर:राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना होळीच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात ऱाज्यपाल म्हणतात” होली हा सण म्हणजे आपल्या विविध समाजातील चैतन्यपूर्ण रंग आणि सहिष्णुतेच्या भावनेचे प्रतिक आहे. हा रंगांचा सण असून सलोख्याचे आणि लोंकांमधील बंधुत्वाचे बंध दृढ करण्याची आपल्याला संधी देतो. कोणत्याही जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता सर्व लोक आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात हे या सणाचे वैशिष्ट आहे. हा एक महत्वाचा सण असून परस्पर संबंध, परस्पर सामंजस्य, सामाजिक एकतेला आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देतो. होळी हा असा सण आहे जिथे रंगबेरंगी चेहरे देशाच्या विविधतेतील एकतेचे अद्वितीय वैशिष्ट्य दर्शवितात.
हा सण गोव्यातील लोकांना अधिक आनंद, प्रेम, समृध्दी आणि आनंद घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.