Connect with us

गोवा खबर

 गोवा स्थित फ्लाय९१ ची  व्यावसायिक ऑपरेशनला सुरुवात

Published

on

Spread the love

~फ्लाय९१ने मनोहर अंतर्राष्ट्र्या विमानतळावरून बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आपली पहिली प्रादेशिक विमान सेवा सुरु केली आहे.

 

~कंपनी गोवा, बेंगळुरू, सिंधुदुर्ग आणि हैदराबादसाठी उड्डाणे चालवेल.

 

गोवा खबर: देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रातील नवीनतम  गोवा स्थित विमान कंपनी फ्लाय९१ने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूसाठी पहिले उड्डाण घेऊन त्याच्या व्यावसायिक ऑपरेशनला सुरुवात केली आहे. मोपा विमानतळावरून सकाळी ०७.५५  वाजता हे विमान निघाले, त्या दिवशी कंपनीने  सिंधुदुर्ग ते बेंगळुरूला पहिले उड्डाणही चालवले. 

 

या विमान सेवेसाठी कंपनीने १९९१ रुपये विशेष भाडे देखील ठेवले आहे. कंपनीच्या उद्घाटन ऑफर सेक्टरमधील सर्व फ्लाईट्सवर वैध असेल. १०० रुपये प्रति आयटमच्या किंमतीत प्रवाशी ऑन-बोर्डवरील विविध प्रकारच्या स्नॅक्स आणि शीतपेयांचा आनंद घेऊ शकतात.

 

आपल्या प्रवाशांना सोयी आणि मनःशांती देण्यासाठी, फ्लाय९१ मर्यादित कालावधीसाठी प्रति सेक्टर ४९९ रुपये प्रति प्रवासी या अतिशय आकर्षक किमतीत फ्लाईट तिकीट बदलण्याची आणि रद्द करण्याची परवानगी देईल.

“फ्लॅ९१चे व्यावसायिक उड्डाण सुरू करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो, पर्यटकांना भारताच्या विविध ठिकाणी जोडणे हे आमचे उद्दिष्ट अहे, हे उद्घाटन उड्डाण केवळ गंतव्यस्थानावर पोहोचण्यापुरते नाही तर ते राष्ट्राची स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन उड्डाण करण्याबद्दल आहे,” असे व्यावसायिक ऑपरेशन्सच्या सुरुवातीबद्दल टिप्पणी करताना, फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको म्हणाले.

 

फ्लाय९१ सुरवातीला गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे ऑफर करत आहे, तसेच एप्रिलमध्ये अगट्टी, जळगांव आणि पुणे येथे ऑपरेशन सुरू करण्याची योजना आहे. एअरलाईन सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाण करेल. बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालवली जातील. गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवाही उड्डाण करणार आहे.

 

“फ्लाय९१ हे भारतीय प्रवाशांना आरामदायी आणि कार्यक्षम सेवेवर लक्ष केंद्रित करून उत्तम प्रवास अनुभव देण्यासाठी तयार केले गेले आहे,” चाको यांनी स्पष्ट केले.

 

कंपनीकडे सध्या दोन एटीआर ७२-६०० विमाने असून येत्या काही महिन्यांत आणखी चार विमाने अपेक्षित आहेत. एअरक्राफ्ट इंडक्शनची ही स्थिर पाइपलाइन एअरलाइनला संपूर्ण भारतातील मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्यात मदत करेल.

फ्लाय९१ला सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम उडाण अंतर्गत मार्गाचा पहिला वाटप करण्यात आला आहे, या मार्गांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, जळगांव, नांदेड आणि लक्षद्वीपमधील अगट्टी तसेच बेंगळुरू, गोवा, हैदराबाद आणि पुणे या इतर व्यवसाय आणि विश्रांतीच्या ठिकाणांचा समावेश आहे.