गोवा खबर:एप्रिल -२०२४ महिन्यात अंत्योदय अन्न योजना रेशन कार्डधारकांना रेशन कार्डामागे ३५ किलो फोर्टिफाइड तांदुळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबांना लाभधारकामागे ५ किलो फोर्टिफाइड तांदुळ मोफत देण्यात येईल..
एपीएल कार्डधारकांना १२.५० रूपये दराने प्रती कार्ड १० किलो फोर्टिफाइड तांदुळ आणि १० रूपये दराने ५ किलो गहू देण्यात येईल.
कल्याणकारी संस्थां योजनेच्या कार्डधारकाना तांदुळ ६.१५ रूपये किलो दराने १५ किलो तांदूळ आणि १५ किलो गहू ४.८० रूपये किलो दराने वितरीत केले जाईल.
स्वस्त धान्य दुकान मालकांनी आपला धान्य कोटा उचलून तो रेशन कार्डधारकांना वितरीत करावा. रेशन कार्डधारकांनी आपला रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून न्यावा. धान्याविषयी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.