गोवा खबर:राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्यावतीने प्रत्येक राज्य आणि संघप्रदेशांतील उत्कष्ठ सहकारी संस्थांना पुरस्कार वितरीत करण्यात येतो. उत्कृष्ठ स्थानिक सहकारी संस्था, उत्कृष्ठ पतपुरवठा सहकारी संस्था, उत्कृष्ठ महिला सहकारी संस्था आणि इतर वर्गात पुरस्कार देतात. २०२२-२३ वर्षाच्या पुरस्कारा साठी उत्कृष्ठ सहकारी संस्थांची निवड करण्यासाठी सहकारी संस्था निबंधकाच्या कार्यालयाने राज्य निवड समिती नियुक्त केली आहे.

विहित अर्ज/नामांकने सहकारी संस्था निबंधकाचे कार्यालय, सहकार संकुल, पाटो-पणजी तसेच पणजी, म्हापसा, फोंडा, मडगांव, केपे आणि डिचोलीच्या सहाय्यक सहकार निबंधकाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज संबंधित विभागिय कार्यालयामध्ये ५ मार्च २०२४ संध्या ५.०० वाजेपर्यंत सुपूर्द करावे.