गोवा खबर: गोवा पर्यटन खाते एसएटीटीई- २०२४ मध्ये सहभागी होणार आहे, जेथे पर्यटन उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात येईल. रिजनरेटिव्ह पर्यटन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य म्हणून गोवा शाश्वत आणि जबाबदार प्रवास पद्धतींमध्ये अग्रेसर आहे आणि उद्योगासाठी एक नवीन मानक स्थापित करीत आहे. या मंडपाचे नेतृत्व पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे, जीटीडीसीचे सरव्यवस्थापक श्री. लक्ष्मीकांत वायंगणकर आणि उपसरव्यवस्थापक, मार्केटिंग जीटीडीसी श्री. दीपक नार्वेकर हे करतील.

एसएटीटीई- २०२४ मध्ये, गोवा पर्यटन पॅव्हिलियन जबाबदार पर्यटन पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन करील. रिजनरेटिव्ह पर्यटनाच्या तत्त्वांचे पालन करून, शाश्वत विकासासाठी गोव्याची अटळ बांधिलकी अधोरेखित करणे हे या सेटअपचे उद्दिष्ट असेल. गोवा पर्यटन प्रवाशांच्या विविध हितसंबंधांसाठी तयार केलेल्या नवीन पर्यटन सेवांचे अनावरणही करणार आहे. सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे उद्दिष्ट शाश्वत पद्धतींमध्ये प्रगती करताना विशिष्ट आणि अविस्मरणीय अनुभव देणे हे आहे.
पर्यटन संचालक श्री. सुनील अंचिपाका आयएएस यांनी “पर्यटनासाठी हा परिवर्तनवादी दृष्टीकोन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य म्हणून, गोवा शाश्वतता आणि जबाबदार प्रवासासाठी एक नवीन मानक स्थापित करीत आहे असे सांगितले.
एसएटीटीई- २०२४ मधील गोव्याचा सहभाग पर्यटन क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी त्याची वचनबद्धता अधोरेखित करतो. शाश्वत प्रवासाचे भविष्य अनुभवण्यासाठी गोवा पर्यटन दालनाला भेट द्या आणि चळवळीचा भाग व्हा.