गोवा खबर:आदिवासी कल्याण संचालनालयानालयाच्यावतीने ‘विद्या लक्ष्मी’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेंतर्गत १० वी इयत्ता परीक्षा उत्तीर्ण होऊन कोणत्याही शाखेत ११ वी इयत्तेत प्रवेश मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीतील मुलींना २५००० रूपये कायम ठेवीद्वारे दिले जातात. ही रक्कम मुलगी जेंव्हा १२ वी इयत्ता बोर्डाची परीक्षा ३ प्रयत्नांत किंवा २ वर्षांच्या पहिल्या प्रयत्नात जे आधी असेल ते तेव्हांच तिला ती रक्कम दिली जाते. १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सुपूर्द केल्यावर कायम ठेव जारी केली जाते.

दरम्यान २०११-२०१२ ते २०१८-२०१९ पर्यंत सुमारे ९५० लाभधारकांची कायम ठेव हक्क न सांगता आदिवासी कल्याण संचालनालयाकडे पडून आहे. अशा हक्क न सांगितलेल्या कायम ठेव अर्जदारांची यादी आदिवासी कल्याण संचालनालयाच्या ( https://tribalwelfare.goa.gov.in ) वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. या अर्जदारांनी आपली कायम ठेव रक्कम मिळविण्यासाठी ही सूचना जारी झाल्यापासून ९० दिवसांच्या आत आदिवासी कल्याण संचालनालय, पणजी किंवा मडगांव येथील कचेरीत संपर्क करावा. असे न केल्यास अर्जदारांची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात येईल.