Connect with us

गोवा खबर

पणजी येथे हुतात्मा दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर: आझाद मैदानावर हुतात्मा दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्यावतीने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहली.

सशस्त्र दलाच्या जवानांनी लास्ट पोस्टची धून आळविली. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.

 

वीज आणि गृहनिर्माण मंत्री श्री. रामकृष्ण सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, आयएएस, वित्त खात्याचे प्रधान सचिव, श्री डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, उत्तर  स्नेहा गित्ते, आयएएस, डीजीपी, जसपाल सिंग, आयपीएस यावेळी उपस्थितांमध्ये होते.

१९४८ मध्ये या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली त्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो.