Connect with us

गोवा खबर

 “विकसित भारत @ २०४७- युवकांचा आवाज” कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती

Published

on

Spread the love

गोवा खबर: राज्यपाल, श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी राजभवन येथील नवीन दरबार सभागृहामध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली संबोधित केलेल्या “विक्षित भारत @ २०४७- युवकांचा आवाज” या कार्यक्रमाला हजेरी लावली.

 प्रक्षेपणानंतर, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राजभवनात आयोजित कार्यशाळांमध्ये विद्यापीठांचे कुलगुरू, संस्था प्रमुख आणि प्राध्यापक सदस्यांना संबोधित केले.     यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘विकसित भारत @ २०४७: युवकांचा आवाज’ कार्यशाळा हे विकसित भारताच्या प्रवासात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी युवा शक्तीसाठी एक अद्भुत व्यासपीठ आहे असे सांगितले.

            स्वातंत्र्याच्या गौरवशाली लढ्याचा प्रेरणास्रोत म्हणून पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. त्या काळात सत्याग्रह, क्रांतिकारी मार्ग, असहकार, स्वदेशी आणि सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा यासारखे प्रत्येक प्रयत्न स्वातंत्र्याच्या दिशेने होते असे ते म्हणाले. या काळात काशी, लखनौ, विश्व भारती, गुजरात विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, अन्नामलाई, आंध्र आणि केरळ विद्यापीठ यांसारखी विद्यापीठे पाहिली ज्यांनी राष्ट्राची चेतना बळकट करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे असे ते म्हणाले.

            पुढे, बोलताना पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारताच्या युवा शक्तीवरील विश्वासाचा उल्लेख केला. ते म्हणाले, विकसित भारताच्या उभारणीसाठी तरुणांना एकत्रित करणे हा व्हॉइस ऑफ यूथचा उपक्रम आहे. विकसित भारत, सशक्त भारत हे देशाचे ध्येय आहे. विकसित भारताचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण थांबू शकत नाही, असेही ते म्हणाले.

अमृत कालची २५ वर्षे आपल्यासमोर आहेत. विकसित भारताच्या ध्येयासाठी आपल्याला २४ तास काम करावे लागेल. हेच वातावरण आपल्याला एक कुटुंब म्हणून निर्माण करायचे आहे पंतप्रधानांनी सांगितले.

            सुरवातीस  भारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले.

            त्यानंतर, राज्यपालांचे सचिव श्री एमआरएम राव, आयएएस, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि शेवटी त्यांनी विकसित भारत २०४७ मध्ये युवकांना योगदान कसे देता येईल याबद्दल सांगितले.

            यावेळी गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी देशाच्या राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यासाठी देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेणे हे विकसित भारतचे ध्येय आहे असे सांगितले. या व्हिजनच्या अनुषंगाने, युवकांचा आवाज हा उपक्रम देशातील तरुणांना विकसित भारत @२०४७ च्या व्हिजनमध्ये योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे ते म्हणाले.

        कार्यशाळेचे महत्त्व सांगून श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी विकसित भारत @२०४७ साठी युवकांना त्यांच्या कल्पना आणि सूचना शेअर करण्यासाठी गुंतवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने कार्यशाळा एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असे सांगितले.

            पंतप्रधानांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना राज्यपाल म्हणाले, पंतप्रधान नेहमीच विद्यार्थ्यांना अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन करतात. ते म्हणाले की, विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य घडविणारे आहेत.

            कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, “इनोव्हेशन, सायन्स आणि टेक्नॉलॉजी” या विषयावर गट च्रर्चा घेण्यात आली. पॅनेलमध्ये गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल बी. मेनन, एनआयटीचे संचालक प्रा. ओआर जयस्वाल, संचालक, आयआयटी प्रा. बी.के. मिश्रा, संचालक, बीआयटीएस पिलानी, गोवा कॅम्पस प्रा. सुमन कुंडू हे होते.

            त्यानंतर डॉ. विकास पिसुर्लेकर, डॉ. प्रीता मल्ल्या, डॉ. धनुष कामत, प्रा. एम. के. जनार्दन आणि प्रा. विठ्ठल तिळवे यांनी नवीन दरबार सभागृह, राजभवन येथे दुसऱ्या सत्रात भाग घेतला.

               श्रीमती. मानसी चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले. संदेश गडकरी यांनी आभार मानले.