Connect with us

गोवा खबर

डिसेंबर  महिन्याचा रेशन कोटा

Published

on

Spread the love

गोवा खबर:डिसेंबर-२०२३ महिन्यात अंत्योदय अन्न योजनेच्या रेशन कार्डधारकांना रेशन कार्डामागे ३५ किलो तांदुळ मोफत देण्यात येईल. प्राधान्यक्रम कुटुंबांना लाभधारकामागे ५ किलो तांदुळ मोफत देण्यात येईल.

एपीएल कार्डधारकांना १२.५० रूपये दराने प्रती कार्ड  १० किलो तांदुळ आणि १० रूपये दराने ५ किलो गहू देण्यात येईल.

कल्याणकारी संस्थां योजना कार्डधारकांना तांदूळ ६.१५ रूपये किलो आणि गहू ४.८० रूपये किलो दराने वितरीत केले जाईल.

 स्वस्त धान्य दुकान मालकांनी ३० नोव्हेंबर पर्यंत आपला धान्य कोटा उचलून रेशन कार्डधारकांना वितरीत करावा. रेशन कार्डधारकांनी आपला रेशन कोटा संबंधित स्वस्त धान्य दुकानातून न्यावा. धान्याविषयी कोणतीही तक्रार असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार किंवा नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडे करावी.