Connect with us

गोवा खबर

जत्रा, फेस्तमध्ये अन्न व्यवसाय करणाऱ्यांना सूचना

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यांत जत्रा आणि फेस्तचा मौसम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने अन्न व्यवसाय/विक्री करणाऱ्यांनी अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. अन्न व्यवसाय सुरू करण्याअगोदर व्यावसायिकांनी अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाकडून एफएसएसआय नोंदणी प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे. स्टॉलमध्ये स्वच्छता राखणे, कामगारांनी स्वच्छ एप्रॉन आणि डोक्याला कपडा बांधणे, स्वयंपाकाची भांडी स्वच्छ ठेवणे, शिजविलेले अन्न झाकून ठेवावे. फक्त मान्यता असलेले रंग प्रमाणात वापरावे.

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जत्रा आणि फेस्तमध्ये खुल्या ठिकाणी तयार करून  विकण्यात येणाऱ्या गोबी मंच्युरियन, स्वीट कॉर्न अशा अन्न पदार्थांच्या सुरक्षेविषयी शी कळवळा व्यक्त केला. त्यासाठी अन्न हाताळणाऱ्यांनी आरोग्य सेवा संचालनालय किंवा नोंदणीकृत डॉक्टरांकडून सॅनिटरी कार्ड घेतले पाहिजे. गुंडाळण्यासाठी किंवा पॅक करण्यास न्युजपेपरचा आणि स्टॅपलर पिनींचा वापर करू नये.

वरील मार्गदर्शक तत्वांचे/नियमांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध अन्न सुरक्षा आणि मानांकन कायदा २००६ खाली कारवाई होईल.