गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पीं एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात दिवाळी हा सण आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. जो जात , पात, धर्म यांचा विचार न करता मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतिक आहे. पौराणिक कथेनुसार लंकेत रावणाचा पराभव केल्यानंतर आणि १४ वर्षाचा वनवास भोगल्यानंतर भगवान राम आणि सीता यांच्या गावी परत आल्याच्या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यात आली याने वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो हे दिसून येते.
दिवाळीच्या या सुंदर सणानिमित्त मी सर्व लोकांना विनंती करतो की समाजातून वाईट गोष्टीचे उचचाटन करा आणि आपल्या देशाची शांतता, सामाजिक सलोखा, सद्भावना, संयम आणि समृद्धी वाढविण्यासाठी कार्य करण्यासाठी स्वतःला झोकून द्या आणि हेच या सणाचे खरे सार आहे.
दिवाळीच्या हा सण आपल्या सर्वांना सुख आणि समृद्धी घेवून येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.