Connect with us

गोवा खबर

नागरी पुरवठा खात्याचा ग्राहक हक्क दिवस साजरा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने हल्लीच व्ही. एम. साळगांवकर कायदा महाविद्यालय, मिरामार यांच्या सहकार्याने ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करून ग्राहक हक्क दिवस साजरा केला.

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक श्री. गोपाळ पार्सेकर, व्ही. एम. साळगांवकर कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाबर अली आणि ग्राहक जागृती समितीचे सदस्य श्री. रॉलांड मार्टिन्स आणि श्रीमती अमिता सलत्री  कार्यक्रमास उपस्थित होत्या.

कार्यक्रमात ग्राहक जागृती माहितीचे बॅनर्स, पत्रके आणि पुस्तिकेचे मान्यवरांहस्ते विमोचन झाले.

यावेळी  बोलताना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक श्री. गोपाळ पार्सेकर यांनी ग्राहक हक्क दिनाचे महत्व सांगताना खात्याच्या ग्राहक विभागाच्यावतीने ग्राहकांच्या जागृतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

 व्ही. एम. साळगांवकर कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाबर अली यांनी आपल्या भाषणात ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागृत असण्याची गरज व्यक्त करून विद्यार्थ्यांनी कोणतीही वस्तू किंवा उत्पादन विकत घेताना एमआरपी किंमती पेक्षा जास्त पैसे देऊ नये, असा सल्ला दिला.

नंतर झालेल्या संवाद सत्रात रॉलांड मार्टिन यांनी उपस्थितांना ग्राहक हक्क आणि कर्तव्यांची जाणिव करून दिली.