Connect with us

गोवा खबर

आता मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार !

Published

on

Spread the love
गोव्यातील ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सवा’त मंदिर विश्वस्तांचा निर्धार

गोवा खबर: 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी जळगाव येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना झाल्यावर महासंघाचे कार्य सतत वाढतच आहेमंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केवळ महिन्यांत महाराष्ट्रातील 131 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहेमंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्यासोबतच आता मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक बनावा यासाठी तो ‘मद्यमांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईलअसा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आलाअशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्रीसुनील घनवट यांनी दिलीही बैठक ‘श्री रामनाथ देवस्थान’फोंडागोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ठिकाणी घेण्यात आलीयाच समवेत ‘मंदिर सुप्रबंधन’, ‘मंदिर संरक्षण’ आणि ‘मंदिर सरकारीकरण अन् अतिक्रमण यांतून मुक्ती’ आदी विविध विषयांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले.

      या संदर्भात अधिक माहिती देतांना श्रीघनवट पुढे म्हणाले, ‘‘विविध चित्रपटांचे चित्रीकरण देशभरातील पौराणिकऐतिहासिक मंदिरांच्या परिसरात होतेया चित्रीकरणाच्या कालावधीत मंदिरांचे पावित्र्यमंदिरांतील वस्त्रसंहितातसेच मंदिर परिसरातील नियम यांचे पालन होत नाहीया नियमांचे पालन होण्यासाठी विविध मंदिरांना निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेतयाचसमवेत जिल्हा पातळीपासून ते गावपातळीपर्यंत पुजारी संपर्क अभियान राबवणारयातून मंदिरपुजारी यांचे संघटन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

        वर्ष 1995 मध्ये वक्फ बोर्डाची स्थापना झालीत्यांच्या कर्मचार्‍यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा दर्जा देण्यात आला आहेत्याच धर्तीवर सरकारने हिंदु मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचेही ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करावे आणि त्यांनाही विशेष सुविधा द्याव्यातया समवेतच मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावेभारतातील ‘सेक्युलर’ सरकार केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतातपरंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीतत्यामुळे सरकारने देशातील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करावीत’’अशी मागणीही श्रीघनवट यांनी या वेळी केली.

       या बैठकीसाठी गोवा येथील गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्रीजयेश थळीमहाराष्ट्रातील जोतिर्लिंग श्री भिमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरेविदर्भ देवस्थान समितीचे सचिव श्रीअनुप जयस्वालमहाराष्ट्र अन् गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुखमंगळग्रह सेवा संस्थानचे श्रीशरद कुलकर्णीनगर येथील श्री भवानीमाता मंदिराचे अधिवक्ता अभिषेक भगतनागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त श्रीरामनारायण मिश्र आणि संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचे श्रीदिलीप कुकडे यांसह 40 मान्यवर उपस्थित होते.