गोवा खबर: नवीन दरबार हॉल, राजभवन येथे फणस महोत्सव संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२१ रोजी राजभवन परिसरात ७१ रोपे लावून फणस बागेची सुरुवात करण्यात आली. आता या बागेतील झाडांना फळे येऊ लागली आहेत, जी लागवडीच्या तारखेपासून २० महिने राहीली असून काढणीसाठी तयार आहेत. राजभवन येथे गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत हा फणस महोत्सव आयोजित केला होता. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यावेळी उपस्थित होते.
गोव्याचे राज्यपाल श्री पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी लागवडीनंतर फणस मिळण्यासाठी साधारणत: सात ते दहा वर्षे लागतात, परंतु राजभवनाने एक ते दोन वर्षात फळ देणारे फणसाचे झाड लावले आहे. असे सांगितले. त्यांनी माहिती दिली की केरळमधून दररोज सुमारे २०० भरलेल्या लॉरी ट्रक आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये फणसाचा पुरवठा करतात. तसेच फणस हे हंगामी फळ असले तरी ते वर्षातील ३६५ दिवस पुरविले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. फणसाला खूप औषधी महत्त्व आहे अगदी कॅन्सरच्या आजारांसाठीही त्याचा उपयोग होतो असे ते म्हणाले.

पुढे बोलताना खेड्यातील जनता आणि शेतकरी ही देशाची संपत्ती असून त्यांच्या माध्यमातूनच देशाचा विकास शक्य आहे असे त्यांनी सांगितले. गोवा राजभवनने गोवा संपूर्ण यात्रा काढली असून त्याद्वारे डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच हेरिटेज यात्रा काढण्यात आली असून त्याद्वारे ३७ हेरिटेज वृक्षांना भेट देण्यात आली आहे. या प्रयत्नांना त्यांनी सर्वांचे सहकार्याचे आवाहन केले.
बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी या फणस महोत्सवाचे आयोजन करून राज्यपाल पिल्लई यांनी गोव्यात सहज उपलब्ध असलेल्या आणि वाया जाणार्या फणसाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे उदाहरण दिले आहे. फणस एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकवायचे असेल तर त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. फणस जपून तीच नैसर्गिक चव टिकून राहिली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक स्टडीज या प्रकारच्या संशोधनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. फणसाबाबत मोठ्या प्रमाणावर मूल्यवर्धन व्हायला हवे, असे ते म्हणाले. आंबा, फणस यांसारखे स्थानिक वातावरणाशी निगडीत विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची गरज आहे. अशाप्रकारे त्याबद्दलचे सविस्तर ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिकविले पाहिजे असे ते म्हणाले.
तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी आरोग्याच्या फायद्यासाठी हंगामी देशी पदार्थ खाण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे सांगितले. हे स्थानिकांसाठी व्होकल फॉर लोकलच्या पंतप्रधानांच्या हाकेसाठी आवश्यक प्रेरणाही प्रदान करील.
राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांना फणसाच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रथम महिला श्रीमती रीटा पिल्लई उपस्थित होत्या.
गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, श्री जॉर्ज कुलंकारा यांचेही भाषण झाले. विशेष अधिकारी, श्री आर मिहीर वर्धन, आयएएस (सेवानिवृत्त)यांनी प्रास्ताविक केले.
राज्यपालांचे सचिव श्री एम आर एम राव, आयएएस यांनी स्वागत केले तर संयुक्त सचिव गौरीश शंखवाळकर यांनी आभार मानले.
सुरवातीस बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर यांनी राजभवन परिसरात फणस आणि नारळाच्या रोपांची लागवड केली आणि राजभवन फणस बागेत फणस काढण्याचे उद्घाटनही केले. फणस महोत्सव प्रदर्शनाची स्थापना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी, उत्तर गोवा आणि कृषी संचालनालयाच्या वतीने करण्यात आली आहे.