गोवा खबर: कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने, सत्तरी सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि डिचोली सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निश्चित मुदतीच्या रोजगाराचे महत्त्व प्रतिपादले आणि उत्तम करिअरच्या संधींसाठी कौशल्य संपादन आणि प्रशिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कमी पगाराबाबत मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त करीत प्रधानमंत्री अप्रेंटिसशिप मेळा आणि कॅम्पस प्लेसमेंट कार्यक्रमांतून उमेदवारांना आपले कौशल्य वाढविण्याची आणि प्लेसमेंटची संधी मिळते. आवश्यक कौशल्ये आणि प्रशिक्षण आत्मसात केल्याने करिअरच्या आशादायक संधींची दारे खुली होतील यावर त्यांनी भर दिला. डॉ. सावंत यांनी गोव्यातील पर्यटन उद्योगातून अंदाजे २ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.


इव्हेंटमध्ये एकूण ५४ कंपन्या आणि चार सरकारी कार्यालयांनी अप्रेन्टीसशिप संधी उपलब्ध करून दिली, तर ५७६ उमेदवारांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली. विविध क्षेत्रात ६४१ रिक्त पदे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये इच्छुक शिकाऊ उमेदवारांसाठी विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत.
कार्यक्रमाला जि.प. सदस्य श्री गोपाळ सुर्लकर, सांखळी नगरपालिकेचे उप नगराध्यक्ष श्री आनंद काणेकर, सांखळी रविंद्र भवनचे उपाध्यक्ष श्री विठोबा घाडी, श्री सीताराम गावस, आयटीआय सत्तरी व्यवस्थापन समिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री सीताराम गांवस, सांखळीचे नगरसेवक श्री ब्रह्मानंद देसाई, सहाय्यक संचालक (प्रकल्प) श्री जॉन काल्देरा, तसेच सत्तरी आणि डिचोली आयटीआय चे कर्मचारी सदस्य आणि सहभागी कंपन्या आणि सरकारी खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती अल्सीना रेबेलो यांनी सूत्रसंचालन केले. उपसंचालक प्रशिक्षण श्री.एस.एस.गावकर, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि सत्तरी सरकारी आयटीआयचे प्राचार्य श्री नीलेश गांवस यांनी आभार मानले.