दौऱ्यादरम्यान ढवळीकरांच्या दाव्यांची केली पोलखोल
गोवा खबर:मंगळवारी सुदिन ढवळीकर यांच्या गडावर म्हणजेच मडकई मतदारसंघात, रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत दौरा केला. यावेळी मनोज परब यांनी मडकई औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाला भेट देऊन स्थानिकांच्या नोकऱ्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
या दौऱ्यादरम्यान परब यांनी तिथल्या दूरवस्था झालेल्या मैदानाची पाहणी केली. जवळजवळ वीस वर्षापासून हे मैदान बनविण्याचे काम चालू आहे. ते मैदान बनविण्यासाठी माती ऐवजी कंपनीचा स्लग वापरण्यात आल्याने त्यावर गवत उगवत नसून, खेळाडूंना खूप त्रास होत होता. जवळच असलेल्या पशू आरोग्य केंद्राला सुद्धा यावेळी परब यांनी भेट दिली असता, अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत ती इमारत उभी होती. करदात्यांच्या पैशातून, उभारली गेलेली ही वास्तू आजपर्यंत वापरात आली नसल्याने ती बेवारस ठरली आहे. या बेवारशी इमारती जवळ अनेक अनैतिक प्रकार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अनेक वाईट गोष्टी तिकडे पाहायला मिळाल्या.
स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर यांनी लोकांना लाचारीत ठेवले असून, पैशांच्या जोरावर ते आज सत्तेत येत असतात. वीस बावीस वर्षे सत्ता भोगुनही मडकई मतदारसंघातील लोकांना आजतागायत मडकई आयडीसी मध्ये रोजगार देता आला नाही. वीस पंचवीस वर्षे काम करणाऱ्या कामगारांना काडून टाकण्यात येते, ते कामगार कंपनिबाहेर उपोषणाला बसतात, न्याय मागतात तरीही, त्यावर आमदार गप्प बसतात, मडकई औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोवा इस्पात सारख्या कंपनी मध्ये कामगारांसाठी बेकायदेशीरपणे लोक वसाहत उभारलेली आहे. तिला पाडण्याचे आदेश असतानासुद्धा त्यावर आमदार लक्ष घालत नाही.
मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. ढवळीकर सतत आपल्या भाषणात मडकई मतदारसंघात विकास झाल्याचा दावा करत असतात. परंतु मनोज परब यांनी या दौऱ्यादरम्यान त्यांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. ढवळीकरांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे मडकई मतदारसंघातील जनतेला आपल्या घरी दरबारात बोलावून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेवून त्यांना लाचारित जीवन जगण्यास भाग पाडणे होय. आतातरी मडकई मतदारसंघातील जनतेने ह्या अकार्यक्षम, बेजबाबदार आमदाराचे राजकारणाला पूर्णविराम देऊन रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाला पाठिंबा द्यावा असे परब म्हणाले.