Connect with us

गोवा खबर

भारतीय हवामान खात्यातर्फे मोबाईल अॅपचा शुभारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय हवामान खाते, भू-विज्ञान मंत्रालयाने अलिकडच्या वर्षांत हवामान अंदाज आणि चेतावणी सेवेच्या प्रसारासाठी अद्ययावत साधने आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम हाती घेतले आहेत. भू- विज्ञान मंत्रालयाने ‘मौसम’ या मोबाइल अॅपचा शुभारंभ केला आहे. हे मोबाइल अॅप प्लेस्टोअर आणि अॅपस्टोअर या दोन्हीवर उपलब्ध आहे.

या अॅपवरून हवामान, अंदाज, रडार प्रतिमा आणि हवामान घटनांबद्दल सक्रियपणे चेतावणीची माहिती घेऊ शकतात. भारतीय ट्रॉपिकल हवामानशास्त्र संस्था, पुणे या स्वाय-त्त संस्थेने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत लाइटनिंग लोकेशन नेटवर्क स्थापित केले आहे. हे अॅप सध्याच्या विजेचे अचूक स्थान आणि गडगडाटी आगाऊ माहिती मिळविण्यात खरोखर मदत करील.

मेघदूत एक साधे आणि वापरण्यास सोपे मोबाईल ऍप्लिकेशन आहे जे शेतकऱ्यांना हवामानासंबंधी माहिती देते. हा भारतीय हवामान खाते, भारतीय ट्रॉपिकल हवामानशास्त्र संस्था आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांचा संयुक्त उपक्रम आहे.

पिकांची पेरणी, कीटकनाशके आणि खतांचा वापर, सिंचन वेळापत्रक आणि जनावरांचे लसीकरण यासारखे हवामान-संवेदनशील निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना  या अॅपची मदत होईल.

सार्वजनिक निरीक्षण अॅप देखील आहे जे वापरकर्त्यांना स्थानानुसार हवामान माहिती मिळते. वापरकर्ते या अॅपवर त्यांची प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. अॅपमध्ये ड्युअल मोड आहे.